नेतृत्वहीन होत चाललेल्या फोंडाघाटवासियांची विकास कामासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे कडे आम सभेची मागणी—

———— बुरा ना मानो होली है

फोंडाघाट (प्रतिनिधी) : एकेकाळी संपूर्ण रत्नागिरी- सिंधुदुर्ग एक जिल्हा असताना राजकीय, सामाजिक, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात फोंडाघाटचा दबदबा आणि नेतृत्व सर्वश्रुत आहे. मात्र आज दहा-पंधरा वर्षात त्याला उतरती कळा लागली आहे. याकडे या गावातील स्थानिकांचे लक्ष नाही किंवा आमदार-खासदारांचे ?अर्थात याला गावातील नेतृत्वाच्या पाठपुराव्याचा अभाव हेही कारण सांगितले जाईल. याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या दबक्या आवाजात ग्रामस्थांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे उपस्थिती फोंडा ग्रामपंचायतीमार्फत आमसभा घ्यावी. अशी मागणी जोर धरत आहे.तसं पाहिलं तर या दशकात फोंडाघाटच्या राजकीय पटलावर शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचा वर चष्मा पाहायला मिळतो.अगदी ग्रामपंचायत, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी, फोंडा हायस्कूल, आरोग्य कमिटी यामध्ये गावातील सुमारे 30 /40 कार्यकर्ते प्रत्येक विभागात आलटून पालटून पहावयास मिळतात. याशिवाय गावात कुणीच लायक नाही ? असे खचितच नाही.मात्र यामध्ये देखील भाजपाचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे….

अशा फोंडाघाटच्या विकासात गेल्या दहा- पंधरा वर्षात कोणताच बदल झाल्याचे दिसून येत नाही. किंवा लक्षणीय विकास झालेला नाही. सर्व क्षेत्रात आणि विकासात नेतृत्वहीन गाव झाल्याचे दबक्या आवाजात पेठेतील अनेक ठिकाणी ऐकावयास मिळते. वस्तुतः उपनेतेपद हे फार मोठे आहे. त्यांच्या माध्यमातून कित्येक विकास कामे होऊ शकली असती.अन्न, वस्त्र,निवारा, रस्ते, पाणी, लाईट, शासकीय योजना इत्यादी मूलभूत सुविधा होतच राहणार. परंतु मते मागताना मिळालेली आश्वासने किती पूर्ण होतात ? याचा त्या त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी विचार करावा. गावाच्या विकासाला खीळ बसणारे महत्त्वाचे कारण म्हणजे, गाव ग्रीन झोनमध्ये गेल्याने सिलिकामाईन्स बंद झाल्या. रोजगार थंडावला .आर्थिक उलाढाल थांबली. खाऊची पानांचा ऐतिहासिक बाजार व्यापाऱ्यांच्या दारोदारी पोहोचल्याने थंडावला. शासकीय कार्यालय नसल्याने वर्दळ कणकवलीस पोहोचली. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली निधीचा गैरवापर– त्यामुळे ट्रॅफिक वर कंट्रोल झालाच नाही आणि विकासही झाला नाही . घोनसरी धरणाच्या डाव्या कालव्याचे काम शासनाच्या आडमुठे धोरणामुळे गेली वीस वर्षे रखडले. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा धुळीला मिळाली. आयटीआयचे तेच कालबाह्य ट्रेड्स त्यामुळे प्रशिक्षणार्थी मिळेनासे झाले. ग्रामपंचायतच्या सुशोभीकरणाचे आणि पारदर्शकतेचे धिंदवडे दिवसेंदिवस उजेडात येऊ लागले.वीज मंडळ, तलाठी, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस आऊट पोस्ट, ग्राम विस्तार अधिकारी इत्यादी विविध विभागामध्ये कामगिरीवरील अधिकाऱ्यांकडे कार्यभार असल्याने, ग्रामस्थांना खेपा माराव्या लागतात. पर्यटन प्रवेशद्वारावरील वारसा लाभलेल्या केंद्र आणि एसटी स्टँड विविध सुविधा पासून वंचित आहे. तेथे पाणीपुरवठ्याची सोय अपुरी आहे.

रस्ता, संरक्षक भिंती, विहिरी, घरे, पायवाटा इत्यादी शासकीय कामे निकृष्ट असून काही महिन्यात खराब झालेली आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षात नेतृत्वहिनतेमुळे किंवा मतांच्या राजकारणात नेतृत्वाचा वचक नसल्यामुळे अशा निकृष्ट अवैध धंदे व बाबी फोपावल्या आहेत. याकडे कुणीतरी लक्ष देणे गरजेचे आहे. चार वर्षा नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती– सदस्य आणि पालकमंत्री इ.सत्तेतील माणसे नक्कीच गावाला पूर्वीचे सक्षम नेतृत्व देऊ शकतात ? यासाठी सर्वांचेच लक्ष फोंडाघाट मधील पालकमंत्र्यांच्या आमसभेकडे लागले आहे…..
———– बुरा न मानतो होली है |

error: Content is protected !!