कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एम्पायर रिअल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड चे सर्वेसर्वा शासकीय ठेकेदार मुद्स्सरनझर शिरगावकर यांनी सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुद्स्सरनझर शिरगावकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिष्टचिंतन करून त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच जनतेच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल सदिच्छा व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रणय शेट्ये हे देखील उपस्थित होते.












