मुंबई विमानतळावर अमित कदम यांचे जल्लोषात स्वागत ! देशवासियांनी केला शुभेच्छांचा वर्षाव !

खासदार नारायण राणे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; कोकणाचा अभिमान वाढला

फोंडाघाट जिम मध्ये मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा विजेता अमितचे उत्साहात स्वागत !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे कोकणी बॉडीबिल्डर अमित अनिल कदम यांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच, भव्य स्वागत करण्यात आले.देशासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या या यशानंतर अमित कदम यांना विमानतळावर चाहते, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच देशवासियांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.अनेकांनी तिरंगा हातात घेऊन अमित कदम यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा केला.यावेळी त्याचे सोबत सुनील कदम अविनाश राजपूत ज्येष्ठ कोच आशिष वर्तक श्रेयस कदम उपस्थित होते..

अनेक वर्षांची मेहनत, कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि जिद्दीच्या जोरावर अमित कदम यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे कोकणातील आणि महाराष्ट्रातील तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
अमित कदम यांनी सांगितले की, “हे यश माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या देशवासियांचे प्रेम, कुटुंबाचे आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी हे यश मिळवू शकलो. हे पदक मी भारताला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो.”

नुकतेच त्याचे त्याच्या गावी फोंडाघाट येथे आगमन झाले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचे स्वागत करण्यात आल फ्युचर फीट जिम मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी आणि चाहात्यांनी, ग्रामस्थांनी पेढे वाटून त्याचे अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणाचा आणि भारताचा गौरव वाढवणाऱ्या अमित कदम यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे……

error: Content is protected !!