पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्ले जि.प.गटात अंगणवाडी सेविका व बालकांना साहित्याचे वाटप

देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडळाच्या वतीने पोंभुर्ले जिल्हा परिषद गटातील ३३ अंगणवाडी केंद्रांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बालकांसाठी छत्री व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
पडेल मंडळ अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालविकास सभापती अनुराधा महेश नारकर यांच्या पुढाकारातून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले, तर ३३ अंगणवाडी केंद्रांतील बालकांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या समृद्धी चव्हाण (फणसगाव), पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर (पोंभुर्ले), माजी सभापती रवी पाळेकर, विजय घरत, उदय पाटील, कृष्ण नर, संतोष चव्हाण, जयेश नर, महेश पडवळ, नितीन वरणे, बाबू आडीवरेकर, कल्पेश नारकर यांच्यासह विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच, भाजप शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. बालकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक आणि अंगणवाडी सेविकांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.

error: Content is protected !!