बांद्यात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या माध्यमातून छत्री वाटप

बांदा (प्रतिनिधी) : “सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जेष्ठ नागरिक संघ बांदा च्या सभासदांना छत्री वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या माध्यमातून हे छत्री वाटप करण्यात आले. पावसाने दडी मारलेली होती त्यामुळे बळीराजावर मोठे संकट आले होते. अशा परिस्थितीत माझा वाढदिवस हा यावर्षी समाज उपयोगी कार्यक्रमाने साजरा करावा असे मत पालकमंत्री यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटून आज बांदा येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता ताई कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच भाजपाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!