सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजप गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेते पदाची निवड गुरुवारी झाली. गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपाचे सर्वच्या सर्व २७ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावर निवडून आलेले अधिकृत संख्याबळ २७ असून यामध्ये प्रमोद पुंडलिक रावराणे, श्रावणी रोहन रावराणे, रिद्धी रितेश सुतार, प्राची देवानंद इस्वलकर, संतोष चंद्रकांत पारकर, मनोज तुळशीदास रावराणे, सुप्रिया संदीप मेस्त्री, शितल अमित दळवी, संदेश श्रीधर सावंत, संजय नामदेव बोबडी, सुयोगी रवींद्र घाडी, अवनी अमोल तेली, अनुराधा महेश नारकर, देवदत्त दामोदर कदम, सावी गंगाराम लोके, सुनील बाळकृष्ण पारकर, क्षमा संदीप हडकर, सुप्रिया संतोष वालावलकर, आरती हरिश्चंद्र पाटील, प्रितेश शंकर राऊळ, शोभा गुलाबराव गावडे, संदीप एकनाथ गावडे, विक्रांत विकास सावंत, अर्पणा वसंत सातोस्कर, प्रमोद मधुकर कामत, श्वेता सूर्यकांत धर्ने व रामा दशरथ गवस या भाजप सदस्यांनी हा गट स्थापन केला आहे. गटाच्या स्थापनेनंतर गटनेते म्हणून संजय बोबडे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत याबाबतचे पत्र दिले आहे. 16 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होत असून संजय बोबडी हे सत्ताधारी असलेल्या गटाचे गटनेते म्हणून काम पाहणार आहेत.

error: Content is protected !!