राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ-मालवण, पणदूर-घोटगे, कसाल-मालवण, तळाशील-तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर

कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ-मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात पणदूर-घोटगे रस्ता रा. मा. १७९ रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ४ कोटी ५० लाख, नेरूर जकातनाका-मानकादेवी MDR ४६ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, चौके-धामापूर-काळसे MDR ४१ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, पावशी-घावनळे रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख, तेंडोली-माड्याचीवाडी MDR ४९ रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख, हळदीचे नेरूर ब्रिज बांधकाम करणे या कामासाठी ४ कोटी ९३ लाख, मालवण-कसाल रा. मा. १८२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, वायरी-तारकर्ली-देवबाग MDR २८ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, कावा ते पेंडूर नांदोस MDR ३४ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, मसुरे-बागायत-चौके MDR ५२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी, तोंडवळी-तळाशील MDR ५२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी, राठीवडे-ओसरगाव MDR २९ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी असा एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून खड्डेमय झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे.

एकूण ११ रस्ते आणि एका पुलासाठी मंजूर झालेला २५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यात खर्ची होणार आहे.

error: Content is protected !!