लोखंडी हातोडीने मारहाण; वरवडेतील युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : लोखंडी हतोडीने कंबरेवर मारून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वरवडे हिवाळेवाडी येथील संकेत रामसिंग डुल्ट याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हनुमंत बोंद्रे (रा. वरवडे फणसवाडी) हे हिवाळेवाडी येथील रेशन दुकानावर शुक्रवार 6 मार्च रोजी सकाळी उभे होते. 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी संकेत डुल्ट हा आपल्या ताब्यातील मोपेड दुचाकीने हिवाळेवाडीतून कणकवलीच्या दिशेने जात होता. हनुमंत बोंद्रे यांना बघून संकेत याने आपली दुचाकी थांबवली आणि बोंद्रे यांला शिवीगाळ केली. तसेच आपल्या दुचाकीच्या डिकीतील लोखंडी हातोडी काढून हातोडीने बोंद्रे यांच्या कंबरेवर डाव्या बाजूने मारून दुखापत केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत हनुमंत बोन्द्रे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार संशयित आरोपी संकेत डुल्ट यांच्याविरोधात बीएनएस 118 (1) तसेच अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!