कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुका भाजपाच्या वतीने आयोजित लक्ष्मी चित्रमंदिर, कणकवली येथे मोफत दाखविण्यात आलेल्या केरळा स्टोरी 2 या सिनेमाच्या पहिल्या शोला कॉलेज युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. लव्ह जिहाद सारख्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात हिंदू धर्मीय युवतींनी फसू नये यासाठी हिंदुयुवा नेते नामदार नीतेश राणे हे संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच आवाज उठवत असतात. जिथे जिथे लव्ह जिहाद सारख्या घटना घडतात तिथे स्वतः जाऊन संकटग्रस्त भगिनींना मदतीचा आणि सहकार्याचा हात देऊन त्याना सावरण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न मंत्री नितेश राणे करताना दिसून येतात. केरळा स्टोरी 2 सिनेमात ही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदू मुलींच्या आयुष्याची फरफट कशी झाली आहे हे दर्शविले आहे. या घटनांतून बोध घेऊन आपण स्वतःचे हित जपले पाहिजे. लव्ह जिहाद सारख्या घटनांचे आपण बळी पडू नये म्हणून आपल्या मतदारसंघातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकणाऱ्या किशोरवयीन मुली तसेच कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलींमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने केरळा स्टोरी 2 सिनेमा मुलींना मोफत दाखविण्यात येणार आहे. या संकल्पनेतील पहिल्या मोफत शोचा शुभारंभ शुक्रवार 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजता लक्ष्मी चित्रमंदिर येथे करण्यात आला. या शोला कणकवली शहरातील विद्यार्थिनींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, तालुका सरचिटणीस समीर प्रभूगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी, नगरसेविका मेघा गांगण, आर्या राणे, प्रतिक्षा सावंत, अभय गावकर, थिएटर व्यवस्थापक राजू मल्हार, दत्तात्रय खुडे, घनश्याम चव्हाण, एस. एम. हायस्कुलच्या प्रा. मनीषा पाटील, श्रीमती गरगटे, श्रीमती पराडकर, श्रीमती गावित आदी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून आयोजित केरळा स्टोरी 2 सिनेमाला युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद











