बांदा निमजगा येथील ज्येष्ठ नागरिक हनुमंत (मंताकाका) सावंत यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा निमजगा येथील ज्येष्ठ नागरिक, बांदा तंटामुक्त ग्राम समितीचे माजी अध्यक्ष तथा बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य हनुमंत (मंताकाका) मुरारी सावंत (वय ८१) यांचे आज शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दिनांक ८) रोजी सकाळी बांदा निमजगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

error: Content is protected !!