फोंडाघाट बस स्टँड परिसर झाला चकाचक

स्वच्छता मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद: रिक्षा संघटनेचा पुढाकार

कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षा चालक-मालक संघटना कोंडाघाटच्या पुढाकाराने स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या आणि ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सहकार्याने रविवारी फोंडाघाट स्टँड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत फोंडाघाट स्टँड परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला.

सुरुवातीला स्वच्छता प्रेमी पत्रकार गणेश जेठे यांनी स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे मोहीम राबवली जाते त्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि स्वच्छता मिशनची संकल्पना सांगितली. त्यानंतर फोंडाघाट गावच्या सरपंच सौ संजना आग्रे यांनी फोंडाघाट गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि फोंडाघाट गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनीही स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्रगीताने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला बस स्टॅन्ड परिसरात संपूर्ण भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याबरोबरच विक्रेते, दुकानदार, स्टॉलधारक, ग्राहक, रिक्षाचालक, वाहन चालक यांना प्लास्टिक कचरा कुठेही टाकू नका अशी विनंती करणारे पत्रकांचे वाटप केले.

यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजू पटेल, फोंडाघाट सहकारी सोसायटीचे चेअरमन राजन नानचे, विश्वनाथ जाधव, रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन पारकर, पदाधिकारी संतोष चव्हाण, कणकवली पत्रकार संघाचे सचिव संजय सावंत,अशोक पेडणेकर, सचिन परब, राजेश शिरोडकर, दीपक इस्वलकर, वर्षा चोरगे, अश्विनी पेडणेकर, सुस्मित घाग, नंदू रावराणे, विजय जामदार, अनिल मेस्त्री, पत्रकार सचिन राणे, गणेश इस्वलकर, मोहन पडवळ, तुषार नेवरेकर, गुरु सावंत, विनायक पाताडे, प्रदीप रावराणे, चंद्रकांत वाळवे, सतीश जाधव, संतोष तेली, जयेश मोंडकर, संतोष बिडये, देवेंद्र हरियाण, राजा तेली, एकनाथ पवार व रिक्षा व्यावसायिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!