सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०२५-२६ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गुणवान ४५ विद्यार्थी आज जिल्ह्याबाहेर सहलीसाठी रवाना झाले आहेत ,जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच उपाध्यक्ष दादा साइल यांनी शुभेच्छा दिल्या.
या सहलीसाठी ज्या शाळा सर्वांत जास्त प्रगत झालेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहेत, अशा शाळांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षीस देण्यासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील (इ.६ वी ते इ.८वी) २३ मुली व २२ मुलगे अशा गुणवंत विद्यार्थ्यांना दि.२३मार्च२०२६ ते २४ मार्च२०२६ या कालावधीमध्ये सहल आयोजित करण्यात आली आहे.
पहिला दिवस-सिंधुदुर्ग नगरी ते कणेरी मठ, बाहुबली गार्डन, वारणा समुह दुध उत्पादने निर्मिती कारखाना, साखर कारखाना, सुतगिरणी, जयसिंगपूर, कोल्हापूर दर्शन. दुसरा दिवस-उद्यमनगर व MIDC कोल्हापूर, पन्हाळा गड भेट व परत सिंधुदुर्गनगरी असा प्रवास होणार आहे .
या अंतर्गत आपल्या राज्यातील मुलांनी भेटी दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण घेवाण, सांस्कृतीक वृध्दीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात सुध्दा वृध्दी होण्यासाठी मदत होणार आहे. सदर विद्यार्थ्यांसोबत महेश देवलकर, उपशिक्षक, जि.प.प्राथ.शाळा संयुक्त मोगरणे, राकेश देसाई,उपशिक्षक जि.प.प्राथ.शाळा वेंगुर्ले नं.३, प्रतिक्षा जाधव, उपशिक्षिका जि.प.प्राथ.शाळा दहिबाव, संजना चिंदरकर, उपशिक्षिका, जि.प.प्राथ.शाळा हरकुळ नं.१ ता.कुडाळ , श्रीम.स्मिता नलावडे, जिल्हा समन्वयक, नियोजन व सनियंत्रण समग्र शिक्षा , हे सहलीसोबत उपस्थित राहणार आहेत.
सदर गुणवंत विद्यार्थ्यांना आज दि.२३ मार्च२०२६ रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे शुभेच्छा देण्यासाठी तुकाराम (दादा) साईल, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग उपस्थित होते. तसेच सदर शाळांचे मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.












