प्रतीक्षा यादीतील ६ उमेदवारांना आरोग्य सेवक पदावर नियुक्ती ; जिल्हा परिषदेकडून आदेश वितरण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत आरोग्य सेवक पु. पदाची भरती प्रक्रिया सन 2025 मध्ये पार पडली. यावेळी सुरुवातीला 47 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली होती. यापैकी काही उमेदवार हजर होऊन राजीनामा दिल्याने प्रतिक्षा यादीतील सहा उमेदवारांना आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आरोग्य सेवक (पु.) यापदावर संबंधित उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आले.

सदरील नियुक्ती आदेश प्रमोद कामत, अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व तुकाराम उर्फ दादा साईल यांच्या उपस्थितीत संबंधितांना प्रदान करण्यात आले. यावेळी रविंद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी व डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग हे उपस्थित होते.

या नवनियुक्त आरोग्य सेवकांमुळे संबंधित उपकेंद्र कार्यक्षेत्रातील जनतेपर्यंत आवश्यक आरोग्य सेवा जास्त प्रभावीपणे पोहचविणे शक्य होणार आहे.

error: Content is protected !!