आचरा (प्रतिनिधी) : भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या महान क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. तिघे हसत हसत फासावर गेले. त्यापासून तो दिवस शहिद दिन साजरा केला जातो. त्यांचा आज स्मृतिदिन.
चिंदर ग्रामपंचायत कार्यालच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात देशभक्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला तलाठी आकाश कराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहिद दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी सिध्देश नाटेकर, विश्राम माळगांवकर, समिर अपराज, रोशनी फर्नांडिस, तुषार पवार, गुरुदास बिर्जे, राजेंद्र घाडी आदी उपस्थित होते.












