आचरा येथे २५ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाचे आयोजन

जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, महसूल उपविभागीय अधिकारी कुडाळ, तहसीलदार मालवण यांची प्रमुख उपस्थिती

आचरा (प्रतिनिधी) : तहसील कार्यालय, मालवण मार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान (टप्प्या १) न्यू इंग्लिश स्कूल आचरा सभागृहात बुधवार २५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराला जिल्हाधिकारी तृप्ती धोडभिसे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, उपविभागीय अधिकारी(महसूल) कुडाळ विभाग ऐश्वर्या काळूशे, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, महसूल अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील आदी उपस्थितीत राहणार असून शिबिरा प्रलंबित फेरफार, ७/१२ चुकांची दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, डिजिटल स्वाक्षरीचे आणि ८ अ उतार्यांचे वाटप, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र,
अकृषिक (NA) परवानगी, अकृषिक (NA) तरतुदीं बाबत मार्गदर्शन व सुधारणा, नविन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडे बंदी कायद्याच्या उल्लंघना बाबतच्या प्रकरणातचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप-ई मोजणी अर्ज, ऍग्रोस्टीक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत या १५ महसुली सेवा शिबिर स्थळी मिळणार असून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ लाभार्थ्यांनी उपस्थित राहून महसूली सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!