तळेरे प्रभाग स्तरीय मुख्याध्यापक सभेत विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर यांचा निरोप समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पीएमश्री प्रभाग शाळा तळेरे नं. १ येथे नुकतीच तळेरे प्रभाग स्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभा उत्साहात पार पडली. या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त करण्यात आलेला भव्य सत्कार आणि प्रभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा सन्मान सोहळा होय. या प्रसंगी व्यासपीठावर तळेरे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, केंद्रप्रमुख संजय पवार, खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर, विनायक जाधव, श्रीपाद बागडी, जगदीश गोसावी, आनंद तांबे, संतोष कुडाळकर आणि महेंद्र पावसकर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर निवृत्त होत असलेले रामचंद्र नारकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

​तळेरे प्रभागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा आणि शिक्षकांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल पीएमश्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ या शाळेचा गौरव करण्यात आला, तसेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत राज्यात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल ज्योती ब्रह्मदंडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच राज्यस्तरीय आयडॉल टीचर प्रवीण कुबल, उत्कृष्ट शिक्षक विनायक जाधव, परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेली केंद्रशाळा साळीस्ते आणि तालुकास्तरावर ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानात यश मिळवलेले खारेपाटण नं. १ चे मुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

​ यावेळी दशरथ भिकू शिंगारे, निलेश ठाकूर, अर्चना तळगावकर, प्रशांत कुडतरकर, अजय सावंत, सत्यवान केसरकर, मंगेश खांबाळकर, गुरुप्रसाद पाटील, जमसू गावित, संदेश तांबे, गोरखनाथ गायकवाड, राजेश तेरवणकर, संतोष धुळप, नाजमीन मुल्ला इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना रामचंद्र नारकर यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. तसेच कैलास राऊत, संजय पवार, प्रदिप श्रावणकर, प्रवीण कुबल, दशरथ शिंगारे, विनायक जाधव आणि इरफान सारंग यांनी नारकर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम विभुते यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर सिताराम पारधीये यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या सभेला तळेरे प्रभागातील बहुसंख्य मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!