जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदासाठी शिंदे शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा

संतोष साटविलकर वित्त व बांधकामसाठी, रुहिता तांबे समाजकल्याणसाठी रिंगणात

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिंदे शिवसेनेकडून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाचे उमेदवारांचे घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत उपनेते संजय आंग्रे यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार वित्त व बांधकाम सभापती पदासाठी मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले संतोष साटविलकर, कणकवली तालुक्यातील जाणवली मतदारसंघातून निवडून आलेल्या रुहिता तांबे यांची समाजकल्याण सभापती म्हणून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, गटनेते केशव नारकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!