कणकवलीतील शैलजा धुमाळे यांचे निधन….!

सामाजिक-राजकीय क्षेत्रात हळहळ…!

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील कनकनगर, ओंकार हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी शैलजा शांतीलाल धुमाळे (वय 62) यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आम. वैभव नाईक यांच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात त्या सक्रियपणे कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. कणकवली न.पं.च्या माजी नगरसेविका नंदिनी धुमाळे,कोल्हापूर सी.पी. आर. हॉस्पिटल मधील अधिपरिचारिका रसिका धुमाळे यांच्या त्या मातोश्री तसेच ओरोस जिल्हा रुग्णालयातील परिचारिका चित्रलेखा धुमाळे यांच्या सासूबाई तर रणजित धुमाळे यांच्या मातोश्री होत.

मंगळवारी सायंकाळी कणकवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!