अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता
वैभववाडी (प्रतिनिधी) : आज सायंकाळी साधारणपणे ३.४५ ते ४.३० च्या सुमारास वैभववाडी तालुक्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात गारांचा वर्षाव देखील होताना दिसून आला. या अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाचा बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे.
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र सायंकाळी वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे थोडावेळ तात्पुरता दिलासा मिळाला.












