कणकवली (प्रतिनिधी) : वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन तसेच तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया,तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.
टोणेमारे, प्रेशित कामत, आराध्या सातवसे, शान्वी खंडागळे (सर्व मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमी कणकवली) , तसेच शिमरन नार्वेकर, जान्हवी कातवणकर, मुग्धा मोंडे, ऋतिका कानेरकर (सर्व शिवरत्न मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी देवगड).त्याचबरोबर ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन परीक्षेत ओंकार पाटील आणि दुर्वा सरूडकर (दोन्ही मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमी, कणकवली). या खेळाडूंनी यश मिळवले आहे. सर्व खेळाडूंना मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमी चे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे तसेच शिवरत्न मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी देवगड चे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच सचिन टेंबवलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदेश पारकर, तसेच पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी ,सुधीर राणे, विनायक सापळे ,अमित जोशी यांनी अभिनंदन केले आहे.












