पत्रकार देवयानी वरसकर यांना मातृशोक

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वराड येथील श्रीमती शोभा प्रभाकर वरसकर वय ७८ यांचं सोमवारी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. गेले पंधरा दिवस त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार देवयानी वरसकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, दीर, वहिनी असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी वराड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!