खारेपाटण येथे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

आरोग्य शिबिर,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप,रुग्णांना फळे वाटप,औषधे वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार नामदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित भारतीय जनता पार्टी खारेपाटण यांच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.

खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला पं. स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच रमाकांत राऊत,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव,सुहास राऊत,खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय सानप,खारेपाटण सोसायटीचे संचालक श्री विजय देसाई,माजी उपसरपंच इस्माईल मुकादम,युवा कार्यकर्ते तेजस राऊत, ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई,किरण कर्ले,सुधाकर ढेकणे,सौ मनाली होणाळे,क्षितिजा धुमाळे,दक्षता सुतार,माजी ग्रा.पं. सदस्य योगेश पाटणकर बूथ अध्यक्ष शेखर शिंदे,शेखर कांबळी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस खारेपाटण भाजप पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून सलग दोन दिवस साजरा करण्यात आला.खारेपाटण शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथील शालेय शालेय विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.तर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप व आरोग्य केंद्राला अत्यावश्यक असणारा सुमारे २५००० रुपये किमतीचे मेडिसीन किट वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला. याबरोबरच विवेकानंद नेत्र रुग्णालय कणकवली यांच्या सहकार्यातून मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर खरेरन हायस्कूल येथे घेण्यात आले.याला नागरिकांचा उस्फुर्त पाठिंबा मिळाला.

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित विशेष कार्यक्रम म्हणून खारेपाटण गावातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या निवडक महिलाना जीवनावश्यक वस्तूंचे धान्य किट यावेळी जि.प.सदस्य प्राची ईसवलकर,पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,सरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते भेट म्हणून देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी केले.

error: Content is protected !!