कणकवलीत अंडरआर्म क्रिकेटचा थरार…!

बांधकरवाडी मित्रमंडळ विजेता : सँडी स्पोर्ट्स उपविजेता…!

सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे व सत्यजित पारकर यांच्या हस्ते विजेत्या संघांचा गौरव…!

कणकवली (प्रतिनिधी) : पटकीदेवी मित्र मंडळ आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत बांधकरवाडी मित्रमंडळाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर सँडी स्पोर्ट्स, कणकवली संघाने उपविजेतेपद मिळवले. विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

येथील विद्यामंदिर पटांगणावर दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींनी मोठ्या उत्साहात अनुभवला. रविवारी सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे व नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जेष्ठ खेळाडू मयूर पेडणेकर,यश हर्णे,रोहित कवडे
मंथन ढवळे,मनीष वाळके, धीरज हुमरसकर, तनिश हुमरसकर,भाई हुमरसकर,विरेंद्र डगरे,श्रीनिवास जगदाळे,रोशन कवडे,चिराग रेपाळ,भावेश कवडे,कार्तिक नेटके,चिन्मय माणगावकर,चिन्मय कोकरे,सुरज पाकले,हर्षल मेस्त्री,वेंदात गावकर,प्रेम कासले
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

यावेळी बोलताना राज नलावडे म्हणाले, क्रिकेट या खेळातून जिल्ह्याला अनेक गुणवंत खेळाडू लाभले असून, त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे. खेळाडूंना आवश्यक ती सर्व मदत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पटकीदेवी मित्र मंडळाने क्रीडा व सामाजिक क्षेत्रात सातत्याने पुढाकार घेतला असून, भविष्यातही विविध क्षेत्रांत ठसा उमटवावा, असे आवाहन करत विजेत्या संघांना व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.अंतिम सामना बांधकरवाडी व सँडी स्पोर्ट्स यांच्यात रंगला. चार षटकांच्या या लढतीत सँडी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करत ५६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात बांधकरवाडी संघाने आक्रमक फलंदाजी करत ५७ धावा पूर्ण करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रत्येक षटकाला वैयक्तिक पारितोषिके जाहीर करण्यात आल्याने सामन्यात चुरस वाढली.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मालिकावीर आदित्य तांबे, उत्कृष्ट फलंदाज शुभम राणे, उत्कृष्ट गोलंदाज आदित्य राणे, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फयान शेख यांचा सन्मान करण्यात आला.

स्पर्धा पाहण्यासाठी विद्यामंदिर पटांगणावर क्रीडारसिकांची मोठी गर्दी उसळली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पंच म्हणून यश हर्णे व चिन्मय माणगावकर यांनी काम पाहिले, तर समालोचन रोशन कवडे यांनी केले.

error: Content is protected !!