खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक विद्यार्थ्यांमधील भाषेची भीती घालवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शेठ. न. म . विद्यालय खारेपाटण यांच्या सौजन्याने विशेष स्पोकन इंग्लिश मार्गदर्शन शिबिरा’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी दिली.यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे ,सचिव महेश कोळसुलकर,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,सचिन कोर्लेकर उपस्थित होते.
येत्या २३ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी,पालक यांना या शिबीरात सहभाग घेता येईल. खारेपाटण हायस्कूल च्या अद्ययावत डिजिटल क्लासरूम मध्ये हे शिबिर पार पडणार असून, यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.तर याशिबिराची ठळक वैशिष्ट्ये:म्हणजेशिबिराची आखणी केवळ व्याकरण शिकवण्यासाठी नसून, प्रत्यक्ष संभाषण कौशल्यावर आधारित करण्यात आली आहे. यामध्ये खालील बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.
दैनंदिन संभाषण: रोजच्या जीवनात लागणारी छोटी-छोटी वाक्ये आणि संवाद.,शब्दसंग्रह वाढवणे: नवीन शब्द आणि त्यांचे अचूक उच्चार शिकवणे.,स्टेज डेअरिंग: व्यासपीठावर उभे राहून न घाबरता इंग्रजी बोलण्याचा सराव.
गटचर्चा (Group Discussion): विविध विषयांवर मुलांमध्ये चर्चा घडवून आणणे.यावर भर देण्यात आला आहे.तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सहभाग या शिबिरात लाभणार असू प्रशिक्षित तज्ञ शिक्षक त्यांच्या सहकाऱ्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
“इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे,अडथळा नाही. मुलांनी केवळ सराव आणि योग्य तंत्राचा वापर केला, तर ते उत्तम संवाद साधू शकतात,” असे मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केले.ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे प्रियंका मोरे ७७९८६६३६२८ यांचेकडे स.८ ते ११ या वेळेत नोंदवावीt.












