गोपुरी आश्रम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय लोकशाहीला दिशा देणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, तसेच वंचित, शोषित आणि पीडित समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी गोपुरी आश्रम, कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत राष्ट्र सेवादल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी दिलेल्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधाननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव निर्माण करण्याचा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी, समाजवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी व विज्ञाननिष्ठ विचारांचे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.आयोजक-आवाहन करते-निमंत्रक राष्ट्र सेवा दल, सिंधुदूर्गचे संबंधीत श्री. विनायक (बाळू) मेसी – व्यवस्थापक गोपुरी आश्रम वागदे- कणकवली, डॉ. राजेंद्र मुंबरकर अध्यक्ष गोपुरी आश्रम, मा. कलमताई परुळेकर- ज्येष्ठ् सेवा दल साथी, मा. नितीन वाळके संघटक राष्ट्र सेवा दल साथी (मालवण), मा. सुहास ठाकुर देसाई ज्येष्ठ सेवा दल साथी, संजय वेतुरेकर- ज्येष्ठ् राष्ट्र सेवा दल साथी (कुडाळ), विजयालक्ष्मी चिंडक, श्रीम. मुर्ती कासार (सावंतवाडी), सहदेव पाटकर, अॅङ प्रविण नाईक- अध्यक्ष राष्ट्र सेवा दल, सिंधुदूर्ग, डॉ. सुभाष सावंत सचिव राष्ट्र सेवा दल सिंधुदूर्ग, भाई परमेकर, सुचन कोरगांवकर, प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.
आपला नम,

error: Content is protected !!