आचरा येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत…!

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले इनामदार श्री देव रामेश्वरांचे दर्शन आणि आशीर्वाद

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आचरा येथे भाजप कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या वतीने गुरुवार ७ मे रोजी रात्री आचरा तिठा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रमोद जठार यांनी आचरा गावाचे ग्रामदैवत इनामदार श्री देव रामेश्वरांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी देवस्थानाच्या वतीने इनामदार श्री देव रामेश्वरांना साकडे घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मंदार सांबारी, प्रकाश मेस्त्री, दिपक सुर्वे, विद्यानंद परब, समिर बांवकर, संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, राजु परुळेकर, महेश मांजरेकर, मंदार सरजोशी, कपिल गुरव, हेमांगी मावजेकर, अजित आचरेकर, रवि घागरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!