पराड शाळेत विद्यार्थी गुणगौरव, बक्षीस वितरण आणि मोफत साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पराडमध्ये विद्यार्थी गुणगौरव, बक्षीस वितरण आणि मोफत साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उमेद प्रबोधिनी संस्थेमार्फत ऑफिस चेअर व मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. पराड ग्रामस्थ मुंबई यांचेकडून मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले. दीपेश आवळेगावकर फाउंडेशन यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतील मुलांना सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले. तसेच शाळेला नेहमी मदत करणाऱ्या जया पराडकर मॅडम या सेवानिवृत्त झाल्यामुळे शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती मार्फत छोटासा सन्मान सोहळा आयोजित केला होता. तसेच आज एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आज शाळेतील दोन्ही शिक्षक सन्माननीय शितल पाटील आणि कृष्णा कालकुंद्रीकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना भविष्यात काय व्हायचे आहे असे प्रश्न विचारून त्यांच्या माध्यमातून भविष्यात त्यांनी निवडलेले स्वप्न सत्यात उतरल्यानंतर ते कसे दिसतील याचे फोटोज AI च्या माध्यमातून बनवून घेतले आणि त्याचही प्रदर्शन आजच्या कार्यक्रमात करण्यात आलं. मुलांनी निवडलेले ध्येय त्याची एक कॉपी पालकांना देण्यात आली आणि एक कॉपी शाळेत त्यांच्यासमोर राहील.

आजच्या या कार्यक्रमाला आंबेरी केंद्राचे केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपलक्ष्मी पराडकर, प्रदीप आवळेगावकर, जया पराडकर, शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा कालकुंद्रीकर सर, शाळेतील सहशिक्षिका शितल पाटील मॅडम तसेच सर्व पालक, ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षिका शितल पाटील मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णा कालकुंद्रीकर सर यांनी केले.

error: Content is protected !!