कणकवली तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्के

कणकवलीचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्के; तब्बल २० शाळांचा निकाल १०० टक्के

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९७.९८ टक्के लागला. तालुक्यातून १४३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील १४०७ उत्तीर्ण झाले. यामध्ये ७५३ पैकी ७३० विद्यार्थी तर ६८३ पैकी ६७७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तब्बल २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये कनेडी माध्यमिक विद्यामंदीर, कळसुली इंग्लिश मिडियम स्कुल, नरडवे इंग्लिश मिडियम स्कुल, सरस्वती हायस्कुल नांदगांव, विद्यामंदीर हरकुळ खुर्द, नाथ पै प्रबोधिनी करूळ, शिवडाव माध्यमिक विद्यालय, आदर्श विद्यामंदीर सावडाव, माध्यमिक विद्यालय बिडवाडी, शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, माध्यमिक विद्यामंदीर घोणसरी, न्यू इंग्लिश स्कुल ओसरगांव – बोर्डवे, माध्यमिक विद्यालय शेर्पे – कुरंगवणे, केसरकर माध्यमिक विद्यालय वारगांव, हरकुळ बुद्रुक उर्दू हायस्कूल, आदर्श विद्याललय करंजे, विद्यामंदीर हायस्कुल लोरे – वाघेरी, सेंट उर्सुला स्कुल वरवडे, बालशिवाजी कणकवली, विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कुल कणकवली या शाळांचा समावेश आहे.

error: Content is protected !!