शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल; दुर्देश सावंत प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव सेवा संघ मुंबई संचलित शिवडाव माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) निकालात १०० टक्के यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विद्यालयातून कु. दुर्देश यशवंत सावंत याने ७९.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. मैथिली मिलिंद कदम हिने ७४.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तर कु. सेजल बालकृष्ण शिवडावकर हिने ७२.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षकवृंदाचे तसेच पालकांचे संस्थेकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!