नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे शाळेचा १०० टक्के निकाल

कु.मदिहा मोहम्मद सतकुट ९३.६ % गुण मिळवून प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा मार्च २०२६ बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या शाळेने आपल्या १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. तर या शाळेची विद्यार्थ्यांनी कु. मदिहा मोहम्मद सतकुट हिने ९३.६ % गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

यावर्षी झालेल्या १० वी बोर्ड परीक्षेत नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे एकूण १२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी चागल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कु. मदिहा मोहम्मद सतकुट हिने ९३.६ % गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर कु. नहीबा शब्बीर काझी हिने ९२.२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. शमिका महेश निग्रे या विद्यार्थिनीने ८९.२ टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच गुणानुक्रमाने उत्तीर्ण झालेले या शाळेचे इतर विद्यार्थी पुढील प्रमाणे – सोहम पंकज कुबल – (८६.०० % गुण),जिद्दान मुबिन सारंग – (८६.०० % गुण ),तरेष संतोष तुरळकर -( ८३.०० % गुण), प्रथमेश संग्राम अडुळकर- (८०.८ % गुण),प्रद्युमन परेश राऊत – (८०.६ % गुण ), अयान अली मुकादम – (७९.०० % गुण ),सार्थक संतोष जाधव – ७८.६ % गुण ), अल्मास अब्दुल वहाब मुकादम – (६२.०० % गुण ),आतिफ जावेद काझी – (५३.८ % गुण ) आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष मनोज गुळेकर तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच शाळेच्या मुख्याधापिक नीलम डांगे व सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!