कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षेत ९७.१९ टक्के निकाल

कासार्डे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एस. एस. सी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९७.१९ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. यंदाच्या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण १०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात कु. अद्विता महावीर पोकळे हिने ४६५ गुण (९३.०० टक्के) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक प्रणव लहू दहिफळे, अथर्व सत्यविजय सावंत आणि कु. रिया विश्वनाथ सावंत यांनी संयुक्तरीत्या ४६२ गुण (९२.४० टक्के) मिळवत प्राप्त केला. तर सर्वेश सतीश कदम याने ४५० गुण (९०.०० टक्के) मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!