जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचे १०० नंबरी यश

सलग सात वर्षे इयत्ता दहावीच्या शंभर टक्के उज्ज्वल यशाची परंपरा कायम

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षीही १००% लागला असून हायस्कूलने सलग सातव्या वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. कु. वेद प्रकाश दामले याने ८७% गुणांसह प्रथम क्रमांक, कु. प्रियांका किशोर त्रिंबककर ८६.८०% गुणांसह व्दितीय क्रमांक, कु. स्वराज निलेश लोके ८३. ४०% गुणांसह तृतीय क्रमांक, कु. साक्षी वासुदेव परब ८३. २०% गुणांसह चतुर्थ क्रमांक तर कु. स्वरित एकनाथ गायकवाड ८२.८०% गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रविण घाडी, सर्व संस्था कार्यकारी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!