शेठ न. म. विद्यालय खारेपाटण हायस्कुलचा ९७.१६ टक्के निकाल

कु. संस्कृती संजय भोर ही विद्यार्थ्यांनी ९३.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे अंतर्गत कोकण बोर्ड च्या वतीने घेण्यात आलेल्या एस. एस. सी परीक्षा – फेब्रुवारी/मार्च २०२६ चा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलचा निकाल ९७.१६ टक्के लागला असून कु.संस्कृती संजय भोर या विद्यार्थ्यांनीने ९३.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. खारेपाटण हायस्कूल मध्ये अनुक्रमे उत्तीर्ण झालेले पहिले तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे – प्रथम – कु.संस्कृती संजय भोर (४६७/९३. ४०% गुण), द्वितीय – कु.आर्या विजय गुरव (४४९/८९.८०% गुण), तृतीय – कु. प्राजक्ता अभय ठाकुरदेसाई (४४४/८८.८०% गुण ) खारेपाटण हायस्कूलच्या मार्च २०२६ रोजी घेण्यात आलेल्या १० वी बोर्ड परीक्षेकरीता एकूण १०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, व सर्व संस्था विश्वस्त यांनी अभिनंदन केले असून प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रथमकु. संस्कृती संजय भोर
९३.४० %

द्वितीय – कु.आर्या विजय गुरव
८९.८०%

तृतीय – कु. प्राजक्ता अभय ठाकुरदेसाई
८८.८०% गुण

error: Content is protected !!