कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी ग्रामविकास मंडळ मुंबई संचलित अ. वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी या प्रशालेत फेब्रुवारी – २०२६ ला पार पडलेल्या S. S. C. परीक्षेसाठी प्रशालेतून एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्य मिळवून ३ विद्यार्थी पास झाले तर १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले, २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास होऊन प्रशालेचा निकाल 100% लागला. प्रथम क्रमांकाची मानकरी कु. पार्थिवी दिपक एकावडे हिला 94% गुण प्राप्त झाले तर द्वितीय क्रमांक कु. काजल पांडुरंग दिवेकर हिला 84.60% गुण प्राप्त झाले तर तृतीय क्रमांक कु. वैष्णवी संतोष भोपळे हिला 77.80% गुण मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अप्पा राणे, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन राजेंद्र राणे आणि सदस्य, मुख्याध्यापक गणपत राजम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे चांगले यश संपादन करून तसेच 100% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.













