अपघातात गावठी पाडी गंभीर जखमी
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका काही संपता संपेना अशी सध्याची स्थिती असून मनुष्य प्राण्याबरोबरच मुक्या जंगली तसेच पाळीव प्राण्यांना देखील या अपघाताची झळ बसत असून महामार्गावरील साळीस्ते येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गायीच्या वासराला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात गायचे वासरू गंभीर जखमी झाले आहे. या बाबत अधिक वृत् असे की, मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील साळीस्ते येथील स्वराज्य बंगल्याच्या समोर आज शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास मुंबई हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाची धडक गायीच्या वासराला बसल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात वासराच्या पायाला व नाका तोडला मार बसला असून बरगड्या देखील मोडल्याचे दिसले. भर उन्हात वाहनांची धडक बसून महामार्गावर जखमी अवस्थेत तडफडत पडलेल्या या मुक्या वासरला तथा गायिच्या पाडीला काही प्रवाशांनी महामार्गावरून जाताना आपल्या गाड्या थांबवून प्राणिमात्रां वरील प्रेम, दया, करुणा दाखवून आपले सामाजिक कर्तव्य समजून त्या जखमी वासराला उचलून रस्त्याच्या कडेला नेऊन एका झाडाच्या सावलीत नेऊन ठेवले. मात्र या अपघाताच्या निमित्ताने आता या परिसरातील गुरे ढोरे तसेच पाळीव मुक्या प्राण्यांना धोका निर्माण झाला असून महामार्गावर वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांनी काळजी घेणे गरजेचे असून परसरातील शेतकरी व नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्याला मोकाट सोडून न देता काळजी घेणे गरजेचे आहे.













