सलग १४ वर्षे दैदीप्यमान यशाची परंपरा कायम
चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ काळसे संचलित, श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे, हायस्कूलचा मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. या परीक्षेसाठी काळसे हायस्कुल मधून 22 विद्यार्थी बसलेले होते ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी कुमारी निरीजा सुशीलकुमार घाडी 89.80% गुण मिळवून प्रथम, कुमारी आर्या मंगेश पात्रे 89.40% गुण मिळवून द्वितीय आणि कु. दिनेश दिपक वरक 86.20% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी, उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींचे संस्था अध्यक्ष विनोद गोसावी तसेच सर्व संस्था संचालक, सल्लागार, माजी विद्यार्थी संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथम – कुमारी. निरीजा सुशीलकुमार घाडी
89.80%

द्वितीय – कुमारी आर्या मंगेश पात्रे
89.40%

तृतीय – कु. दिनेश दिपक वरक
86.20%












