माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा दहावीचा निकाल १०० टक्के१९ विद्यार्थ्यांनी मिळवले विशेष प्राविण्य

कनेडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडीने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील सर्व ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या निकालात १९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवले आहे. तसेच २९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर २ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश संपादन केले आहे.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. तांवें अर्थव गंगाराम याने ९५.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. भंडारकर ऋद्धी रविकांत हिने ९४.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. सावंत आर्या प्रदीप हिने ९२.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!