विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवलीचा दहावीचा निकाल ९८.१७ टक्के

सान्वी कारेकर हिचे शंभर टक्के गुणांसह उज्ज्वल यश; प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेचा निकाल ९८.१७ टक्के लागला आहे. प्रशालेतील १६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रशालेत कु. सान्वी रघुनाथ कारेकर हिने ५०० पैकी ५०० गुण मिळवत शंभर टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. समृद्धी शंकर धुरी, कु. चिन्मयी सुहास गुरव आणि कु. गौरी सुनिल खोचरे यांनी प्रत्येकी ४८४ गुण (९८.२० टक्के) मिळवत संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

तसेच कु. वरदा दत्तप्रसाद मराठे हिने ४८१ गुण (९७.२० टक्के) मिळवत तृतीय क्रमांक, कु. राशी संदीप राणे हिने ४७६ गुण (९६.६० टक्के) मिळवत चौथा क्रमांक तर कु. प्रांजल जयवंत ठाकूर हिने ४७५ गुण (९६.०० टक्के) मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!