एक्साईज इन्सुली चेकपोस्ट पथकाने पकडले कोट्यवधींचे घबाड

बांदा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई केली. बांदा येथील खालसा पंजाबी ढाब्यासमोर अवैध मद्याची वाहतूक करणारे सहाचाकी वाहन पकडून तब्बल १ कोटी २३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे इन्सुलि तपासणी नाका नेहमी प्रमाणे गस्त घालत होते. दरम्यान ​विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या सहाचाकी ट्रकमध्ये सीजी ०४पीक्यू ०३३५ विदेशी मद्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून तपासणी केली असता, लाकडी भुश्याच्या आड दडवलेले ‘रॉयल ब्ल्यू व्हिस्की’चे १०८० बॉक्स आढळून आले यामध्ये ५१,८४० बाटल्या जप्त केल्या. यामध्ये १ कोटी ०३ लाख ६८ हजार रुपये तर ​टाटा ट्रक २० लाख रुपये असा एकूण १ कोटी २३ लाख ६८ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी पंकज गोविंद व्यास (वय ३३, रा. मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, रणजित शिंदे, जवान दीपक वायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!