वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप जयंती साजरी

कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते संभाजी चौक येथे ध्वजारोहण संपन्न.

वैभववाडी (प्रतिनिधी) : शौर्य, स्वाभिमान आणि बलिदान यांचे मूर्तिमंत प्रतीक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे. पं. स. सदस्य मंगेश लोके उपस्थित होते. त्यानंतर संभाजी चौक येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्याने महाराणा प्रताप यांची वेशभूषा साकारली होती. तसेच पारंपारिक वेशभूषेत प्रशालेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर महाराणा प्रतापसिंह कलादालन येथे असलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराणा प्रताप की जय…! असा जयघोष करत उपस्थितांनी कलादालन परीसर दणाणून सोडला. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सुनिल रावराणे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक विजय रावराणे, शरद नारकर, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, व्यापारी मंडळ तालुकाध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस आंबेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. जाधव तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!