फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारताच्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. त्याचा पहिला टप्पा स्वगणना प्रत्येक कुटुंबातील एकाने – https://se.census.gov.in/add-details या पोर्टल वर घरासंबंधीची माहिती नोंद करणे आवश्यक आहे. स्वतः किंवा ग्रामपंचायत अथवा ग्राम महसूल अधिकारी यांचे द्वारे हा डाटा ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. हे केल्यावर आपणा कुटुंबाला 11 अंकी आयडी, एसएमएस द्वारे पाठविला जातो.तो दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या प्रगणकाला सांगणे आवश्यक आहे. म्हणजे भारताची जनगणना योग्य प्रकारे पार पडेल. त्यामुळे फोंडा पंचक्रोशीतील प्रत्येकाने स्वगणना जरूर करावी व देशाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत भाग घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन फोंडाघाट गावच्या सरपंच संजना आग्रे यांनी केले आहे. ब्रह्मनगरी येथे फोंडाघाट मंडल अधिकारी पी. एम. मोंडे, ग्राम महसूल अधिकारी जी. व्ही. शिंदे (लोरे), समृद्धी गवस (फोंडाघाट), ए. पी. भूसके (घोणसरी) व महसूल सेवक पांडुरंग राणे यांचे उपस्थितीत सरपंच संजना आग्रे यांनी स्वगणना पूर्ण केली.
देशाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक कुटुंबीयांनी भाग घेऊन स्वगणना पूर्ण करावी संजना आग्रे












