बांदा (प्रतिनिधी) : पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापनदिन सोहळा रविवारी 10 मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 7 वाजता भजन तर रात्री 9 वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीनयुक्त ‘दख्खनचा राजा जोतीबा माझा’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
पाडलोस रवळनाथ माऊली पंचायतनचा रविवारी वाढदिवस










