तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. प्रशालेमधून एकूण 49 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. 47 विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेचा निकाल 95.92% लागला आहे. यामध्ये विद्यालयातील स्वयंम मिलिंद महाडिक याने (441गुण) 88.20% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभम महेश तेली (437 गुण) 87.40% मिळवत द्वितीय तर अथर्व संतोष जठार याने (421 गुण) 84.20% मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरचिटणीस श्रीकृष्ण तुकाराम खटावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अरविंद महाडिक, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद, आजी-माजी सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचेकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













