अनेकांच्या घराची कौले व पत्रे उडाले,तर विद्युत पोल मोडून वीज वाहिन्या रस्त्यावर
अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून रस्ते बंद
कोटीच्या घरात नागरिकांचे नुकसान
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे आज शनिवार दी.९ रोजी दुपारी ३.०० वाजताच्या दरम्यान पडलेल्या अवकाळी जोरदार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने चक्रीवादळाने खारेपाटण येथे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घराची कौले व सिमेंट पत्रे वाऱ्याने उडून गेले असून परिसरातील विद्युत् पोल मोडून खाली पडले असून.वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर लोंबकळत आहेत.याबरोबरच अनेक ठिकाणी घरावर व वाहनावर झाडे कोसळली असून काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक बंद झाली होती.तर वीज पुरवठा खंडित झाला आहे.तर सुमारे कोटी रुपयांच्या च्या घरात येथील नागरिकाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खारेपाटण मध्ये झालेले चक्रीवादळ हे आजपर्यंत झालेल्या वादळापेक्षा मोठ्या प्रमाणात झालेले वादळ असून एवढ्या मोठ्या प्राणातले वादळ आजपर्यंत झाले नसल्याचे जानकर सांगतात.खारेपाटण हायवे ते वरुण खारेपाटण बाजारपेठ मध्ये येणाऱ्या रस्त्यावर हायस्कूलच्या वळणार मोठे आंब्याचे झाड पडून रस्ता काही काळासाठी बंद झाला होता.तर खारेपाटण ते पोंभुर्ले रस्त्यावर वायंगणी बाणेवाडी येथे मोठे आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतूक बंद झाली.या मार्गावरील प्रवासी अक्षरश पायी चालत आपल्या घरी गेले.तर विजयदुर्ग कोल्हापूर या रस्त्यावर फणसगाव कॅन्टीन या राज्य मार्गावर दोन ठिकाणी मोठी झाडे पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
खारेपाटण पंचशील नगर येथे वादळी वाऱ्याने अनेकांच्या घराची कौले व पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत.तर याच ठिकाणी पाच विद्युत पोल मोडून पडले असून वीज वाहिन्या रस्त्यावर पडल्या आहेत.याबरोबरच खारेपाटण रामेश्वर नगर,कपिलेश्वरवाडी, कालभैरव वाडी,शिवाजी पेठ, बंदरगाव,काजिर्डे,संभाजी नगर,कर्लेवाडी,जैनवाडी,कोष्टेवाडी, गुरववाडी,हसोळ टेंब कोंडवाडी आदी भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक नागरिकांचे आंबा काजू कलमाची झाडे केळी फणस आंब्याची झाडे या वादळाने मोडून पडली आहेत.तर वीज वाहिन्या तुटून खाली पडल्या आहेत.
खारेपाटण काझीवाडी येथील श्री मुश्ताक पावसकर यांच्या घराचे लोखंडी पत्राचे छप्पर वादळात उडून याच वाडीतील नजीर काझी घरावर पडल्यामुळे या दोन्ही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबरोबरच खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व प.पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीवरील पत्रे वादळात उडून गेले आहेत.तर या इमारतीवरील हवेने उडालेला एक पत्रा खारेपाटण मधील एका युवकाच्या डोक्यात पडल्यामुळे तो जखमी झाला आहे.खारेपाटणमध्ये झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संपर्क साधून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान खारेपाटण मध्ये झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण ग्रामविकास अधिकारी श्री विशाल वरवडेकर यांनी प्रत्यक्ष खारेपाटण येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान खारेपाटण येथे आज झालेल्या वादळामुळे येथील वीज पुरवठा पूर्णतः बंद झाला असून आहे.

















