खारेपाटण येथील वीज पुरवठा पाच दिवसानंतर सुरळीत सुरू

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कर्मचारी वर्गाने दिवस रात्र घेतली मेहनत

ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे मानण्यात आले आभार

खारेपाटण (प्रतिनिधी) : अवकाळी पडलेला पाऊस आणि जोरदार झालेले चक्रीवादळ यामुळे खारेपाटणसह पंचक्रोशीतील नागरिकांचे जन जीवन विस्कळीत झाले होते. नागरिकांच्या मालमत्तेच्या नुकसानी बरोबरच परिसरातील संपूर्ण वीज पुरवठाच खंडित झाल्याने नागरिक गर्मी व उकाड्याने हैराण झाले होते.तर सलग चार रात्र अंधारात काढाव्या लागल्या होत्या.मात्र या गंभीर परिस्थितीवर वीज अधिकारी व कर्मचारी वर्गाने मात करत दिवस रात्र काम करून वीज पुरवठा सुरळीत केला.व अखेर पाचव्या दिवशी खारेपाटण मधील १०० टक्के वीज पुरवठा सुरू झाला.या संपूर्ण परिस्थितीची गंभीर दखल घेत पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून नागरिकना दिलासा दिल्याबद्दल खारेपाटण सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.

खारेपाटण मध्ये चक्रीवादळ झाल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली तर अनेकांच्या घराची कौले व पत्रे उडून गेले होते.तसेच अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले होते.व वीज तारा तुटून खाली पाडल्या होत्या.त्यामुळे खारेपाटण मधील वीज पुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला होता. नागरिकांना चार रात्र अंधारात काढाव्या लागल्या होत्या.मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे वरिष्ट अभियंता चव्हाण श्री खोत तर खारेपाटण येथील सहाय्यक अभियंता श्री सकपाळ व त्यांच्या सर्व टीम ने अहोरात्र मेहनत घेऊन खारेपाटण मधील वीज पुरवठा पूर्ववत सुरू केल्याबद्दल त्याचे देखील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

दरम्यान या संपूर्ण परस्थितीत खारेपाटण जि.प. सदस्या प्राची ईसवलकर व पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव माजी सरपंच रमाकांत राऊत,संतोष पाटणकर,योगेश पाटणकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व महसूल प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी प्रयत्न केले.तसेच खारेपाटण मध्ये चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने वीज अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सतत पाठपुरवठा करत व प्रत्यक्ष साईटवर जाऊन मदत कार्य केले.

चिंचवली येथे देखील मोठ्या प्रमाणात वीज पोल पडून वीज पुरवठा खंडित झाला होता.पाणी पुरवठा बंद होता.येथील ग्रामस्थानी वीज अधिकाऱ्यांना धारेवर धरत याचा जाब विचारला होता.अशा परिस्थीत जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव माजी सरपंच रमाकांत राऊत,संतोष पाटणकर यांनी चिंचवली गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.सरपंच अशोक पाटील व भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर यांनी गावात गेली सात दिवस वीज नसल्या बद्दल नाराजी व्यक्त केली.यावर तातडीने ॲक्शन घेत जि.प.सदस्य ईसवलकर व पं.स.सदस्य यांनी वीज अधिकाऱ्यांना चिंचवली गावातील वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी जादा कर्मचारी वर्ग वापरून वीज सुरू करण्याच्या सूचना केल्या.दरम्यान चिंचवली गावात वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला असून अजूनही काही भागातील किरकोळ काम वीज कर्मचारी आजही करत आहेत.

या संपूर्ण नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत नागरिकांनी संयम दाखवून प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल खारेपाटण जि.प. सदस्य सौ प्राची ईसवलकर,पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.


error: Content is protected !!