चार जलतरणपटूंना पहिल्या दहामध्ये स्थान; रत्नागिरीतील स्पर्धेत जिल्ह्याचा ठसा
ओरोस (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा 2026 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूनी दमदार कामगिरी करत चार जलतरणपटूनी पहिल्या दहा नंबरात येण्याचा मान पटकावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाट्ये बीच येथे आठवी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा रत्नागिरी जिल्हा अमॅच्युअर ॲक्वाक्टिक असोसिएशन व महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर ॲक्वाक्टिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते व काही प्रमाणात इतर राज्यातूनही स्पर्धक आले होते ज्यामध्ये गोवा मध्य प्रदेश गुजरात ओडिसा येथील स्पर्धक होते त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूनी सहभाग घेत चमकदार कामगीरी केली त्याचा निकाल पुढील प्रमाणे :-14 वर्षाखालील मुलीच्या गटात दोन किलोमीटर मध्ये स्वरा संदीप गावडे दहावा क्रमांक, सहा वर्षाखालील मुले गटात 500 मिटर मध्ये आर्य ठाकूर चौथा क्रमांक, 14 वर्षाखालील मुले पाच किलोमीटर मध्ये विधान विठ्ठल धुरी चौथा क्रमांक आणि रुद्र प्रवीण सुलोकार सहावा क्रमांक, 14 वर्षाखालील मुले दोन किलोमीटर यशस्वीरीत्या अंतर पूर्ण करत स्वराज बाळा सावंत तेरावा क्रमांक पटकवला आहे. सर्व विजय स्पर्धकांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर श्री माने, मनीषा बेडगे आदी उपस्थित होते. सर्व स्पर्धकांना सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण प्रशिक्षक प्रवीण सुलोकार व बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे प्रशिक्षण लाभले या सर्व स्पर्धकांना सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, शितल शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

स्वरा गावडे

स्वराज सावंत

विधान धुरी

रुद्र सुलोकार

आर्य ठाकूर












