बांदा (प्रतिनिधी) : तांबोळी देसाईवाडी येथील माजी सैनिक (इंडियन नेव्ही-एमसीपी ओ) विश्वास अमृत देसाई ( वय 85) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले.त्यांनी देश सेवेसाठी 35 वर्ष सेवा केली. तसेच सैनिक नागरी पतसंस्था सिंधुदुर्ग ( बांदा शाखा) अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेंच पतसंस्थेसाठी त्याचे खूप मोठं योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे,2 मुली,सुन नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई यांचे वडील होय.
माजी सैनिक विश्वास देसाई यांचे निधन












