तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बेंगलोर येथील इस्रो भेटीची संधी
कणकवली (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन(DTSE) मार्फत घेतल्या गेलेल्या तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये तालुक्यातून प्रथम,द्वितीय, तृतीय,उत्तेजनार्थ व सुवर्णपदक मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी इस्रो अंतराळ प्रदर्शन परीक्षा 7जून 2026 रोजी घेतली जाणार आहे. लहान वयापासून मुलांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी, त्यांच्या मनात असणारी स्पर्धा परीक्षेची भीती निघून जावी यासाठी दरवर्षी डीटीएसई मार्फत तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली जाते या परीक्षेत प्रथम, द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येते तसेच चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येते या परीक्षेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र दिले जाते.डीटीएसई तालुकास्तरीय परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय,उत्तेजनार्थ व सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने इस्रो अंतराळ प्रदर्शन बेंगलोर येथे भेट देण्याची संधी दिली जाते यासाठी संस्थेमार्फत पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 7 जून 2026 वार रविवार या दिवशी नेमलेल्या सहा परीक्षा केंद्रावरती घेतली जाणार आहे. बारामती,शिरूर,तुळजापूर,वेळापूर,हडपसर व कणकवली अशा सहा ठिकाणी पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो अंतराळ प्रदर्शन बेंगलोर येथे भेट देण्याची संधी मिळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या डीटीएसई तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेत नर्सरी ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.












