अनुभव शिक्षा केंद्र आणि युवा संस्थेच्या वतीने पर्यावरणीय अभिनव संकल्पनेला सुरुवात

बाळाच्या बारशाच्या वेळी जोडणार झाडाशी अनोखे नाते

कुडाळ (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र आणि युवा संस्था यांच्या अंतर्गत कोकणात सर्वप्रथम पर्यावरण बदल व पर्यावरणीय न्याय मिळवून देण्याकरिता मु.आंब्रड ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे ”झाडे लावा झाडे जगवा” हि एका वेगळ्या पद्धतीने सिंधु भुमीत संकल्पना मांडली.जन्मलेल्या मुलाच्या बारशाच्या वेळी हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमाचा उद्देश असा आहे कि ज्या वेळी बाळाच्या नावाने बाळाच्या जन्माचा एक झाड दिले जाते तेव्हा त्या बाळासमवेत संपूर्ण कुटुंब त्या झाडाला भावनिक स्वरूप देवुन हे झाड जगवते.नुसते झाडे लावली आणि त्या झाडाचे संरक्षण केले नसेल तर ते झाडाची वाढ होत नाही. प्रत्येक झाडामध्ये मानवाच्या भावनिक संबंध जुळवुन दिले तर ते झाड दिर्घकाळ जगु शकते. हा उपक्रम गावोगावी खेडोपाडी जावुन करणे आवश्यक आहे असे त्यावेळी साथी राहुल यांनी तेथील ग्रामस्थांना समजून दिले.या मोहीमेत अनुभव शिक्षा केंद्राचे साथी देवगड/कणकवली तालुका समन्वयक राहुल विजिता विजय कांबळे,बाळाचे नाव स्वरूप कदम, प्रफुल्ल कदम, प्रियांशी कदम भिमराव कदम,स्वप्निल कदम,अक्षय कदम, प्रकाश कदम,तुषार कदम मनिष कदम यांची उपस्थिती उत्साही स्वरूपाची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!