देवगड (प्रतिनिधी) : मिठमुंबरी येथील अनिल तुकाराम डामरी(६५) हे त्यांच्याच बागेतील विहीरीमधील पाण्यात उताणी स्थितीत रविवारी सकाळी ८ वा.सुमारास मिळाले.ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगीतले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मिठमुंबरी येथील अनिल डामरी हे त्यांच्याच बागेतील विहीरीच्या पाण्यात उताणी स्थितीत रविवारी सकाळी ८ वा.सुमारास त्यांचा मुलगा संजय याला दिसले.त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.विहीरीत उताणी स्थितीत असलेल्या अनिल डामरी यांना विहीरीतून बाहेर काढून देवगड ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.वैद्यकीय अधिकारी यांनी ते मयत झाल्याचे सांगीतले.याबाबत देवगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली असून तपास पो.हे.कॉ.उदय शिरगांवकर करीत आहेत.
मिठमुंबरी येथील अनिल डामरी यांची विहीरीत उडी टाकून आत्महत्या










